मायबोली

मराठी भाषा ही खूप अलंकारिक आणि समृद्ध आहे अस आपण नेहमीच म्हणतो. मराठी भाषेतलं साहित्य समृद्ध आहे. लेखक, कवी हे खरंच प्रतिभावंत आहेत. प्राचूर मराठी आणि आधुनिक मराठी यांच मिश्रण असलेली आपण वापरत असलेली ही सध्याची मायबोली, वापरातून दिवसेनदीव खरच कमी होत चालल्याची एक खंत खूप दिवसापासून टोचन देतीये. मराठी भाषेचा सुवर्णकाळ म्हणजे कुसुमाग्रज, नाथमाधव, रणजित देसाई, सावरकर, भालजी पेढारकर, वसंत कानेटकर, पुल, वि.स.खांडेकर आणि अनेक यांचा काळ. या सर्वांनी लिहलेल्या कादंबऱ्या, काव्य, नाटकं आणि त्यासाठीचा अभ्यास या मुळे मराठी भाषा, संस्कृती आणि त्यासोबत जनता एकूणच समृद्ध झाली. प्रत्येक भाषा मग ती इंग्रजी असो, जर्मन असो का फ्रेंच, समृद्ध होते ती फक्त त्यामधल्या साहित्यामुळे, त्यामधल्या कवी, लेखकांमुळे. त्यांच्या अलंकारिक लेखनामुळे ती अधिकाधिक समृद्ध होते तिचा लौकिक सर्वदूर पसरतो. वरील सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने मराठी खरच शिखरावर पोहोचली होती, अस आज त्यांची पुस्तकं वाचताना हमखास जाणवत. मराठी भाषा ही काही जागतिक स्तरावर वापरात असणारी भाषा नाही, तरीही आपलं साहित्य हे समृद्ध आहे. पुल ने उभे केलेले पात्रांची पोहोच खरच मोठी आहे. नाथमधवांची अलंकारिक भाषा तर भल्याभल्याना पाणी पाजते. पण हे सगळे आता होऊन गेले, इतिहास झाला तो आता. “आपण फक्त इतिहासातच राहिल तर इतिहास घडवणार कोण?” अस डॉ.लागू म्हणतात . पण आपण इतिहास बनवणाऱ्या पिढीला मराठीच तोकड शिक्षण देऊन मारून टाकतोय का? महाराष्ट्रात राहून मराठी भाषा हा पर्यायी विषय ठेवणाऱ्या शाळांवर तर खरच कीव येते.
सध्या महाराष्ट्रात मराठीचा नाही तर इंग्रजीचा सुवर्णकाळ दिसतोय, फक्त महाराष्ट्रच नाही तर एकूणच भारतातच ही परिस्तिथी आहे अस म्हणलं तर वावगं ठरणार नाही. इंग्रचीच आलेलं हे वादळ आपल्या मराठी शाळा, कॉलेज केव्हाच घेऊन गेलंय. आत्ता म्हणजे १९९५ नंतरच्या काळात हे वादळ तीव्र होत गेलंय. या गोष्टीचा मी विरोध करतोय अस नाही, पण मराठी शाळेत शिकलेला तरुण कुठेतरी भाषेमुळे मागे पडतोय हे मी सध्या पाहतोय. बालचामुंना शाळेत घालताना आजकाल “त्याला काहीही झालं तरी मराठी शाळेत घालू नकोस” हे विरार वरून दादर ला जाण्याऱ्या लोकल मध्ये जवळून ऐकतोय, एवढंच काय एकाला Thursday ला मराठीत गुरुवार म्हणतात आणि मराठी मधला ९ हे इंजिनीरिंग ला आल्यावर सुद्धा confusing वाटत म्हणे. याचं कारण विचारल्यावर आम्ही कॉन्व्हेंट चे अस निर्लज्जतेने सांगितले त्याने.
मराठी भाषेतून शिक्षण झालेल्या मुलांचा कॉन्व्हेंट च्या मुलांबरोबर राहताना येणारा न्यूनगंड, त्यामुळे हारावणार सेल्फ कॉन्फिडन्स आणि पर्यायी मागे राहणं किंवा इंटर्व्हिएव देताना फ्लूइंट इंग्लिश नसल्यामुळे ऐकावे लागणारे इंग्लिशच्या महत्वाचे शब्द, इतकच काय तर व्हाट्सएपच्या ग्रुपवर इंग्रजी संभाषणात घाबरून भाग न घेणारी जनता बरीच आहे. मराठी शाळेत होणारी इंग्लिशची हेटाळणी हे या मगच प्रमुख कारण आहे, उगाच मराठी शाळेत जाणारी जनता कमी नाही झालीये, ज्ञानाचा अभाव हेच त्याच कारण आहे, मराठी माध्यमातली सगळीच पोर मागे पडली असा नाही मेहनत करणारा पुढे जातोच पण exposure कमी मिळाल्यामुळे जास्ती मेहनत करावी लागते आता ह्यात आपण काय करू शकतो का? इंग्रजीच प्रत्येकाच्या आयुष्यातल स्थान हे सध्या खरच महत्वाच आहे, पण आपणच जर आपल्या मायबोलीचा तिरस्कार करण चालू केलं तर ती पुढे जाईल का, समृद्धीच सोडा हो पण उद्या ती रोजच्या वापरात तरी राहील का?
जर्मन, फ्रेंच, जापनीज ह्या काही जागतिक भाषा नाहीत, तरी त्या शिकण्यासाठी साधन, शिकवण्या, मॅक्समुलर भवन सारख्या संस्था आपल्याकडे उपलब्ध आहेतच की, यामध्ये त्या लोकांचे आपली भाषा जगभर पोहोचवण्याची धडपड दिसून येते, त्यांच outreach खरंच वाढतोय. यात महत्वाची गोष्ट ही की इंग्रजी ही कितीही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी व्यावसायिक भाषा असली तरी मायबोली ती मायबोलीच.
आज मराठीचा एकंदरीत उपयोग, लोकांचा त्याकडचा कल कमी झालेला दिसतोय कारण तोडीच साहित्य कमी झालंय, मराठीत संदीप खरे सोडले तर दुसरे कवी सांगायला युवक गूगल डुंढाळतो. मध्यंतरी अच्युत गोडबोले, विजया वाढ, नरेंद्र जाधव यांची काही पुस्तके आल्यावर मराठीचा बोलबाला सुरू झाला होता पण तो थोडा थंडावलाय, फेसबुक च्या माध्यमातून लेख लिहिणारी बरीच मंडळीमुळे मराठी जनता मराठी मध्ये विचारविनिमय करताना दिसतंय, इंग्रजी मधून प्रदर्शित होणाऱ्या नेटफलिक्स वरील सो कॉल्ड “क्वालिटी कन्टेन्ट” च्या जमान्यात भाडीपा पण जम बसवतोय,शिव्या देत शब्द जुळवून stand up करून हासवण्याऱ्या कॉमेडियन पेक्षा पुलंचे कथाकथन ऐकल्यावर पण प्रसन्न होते, एक गोष्ट आजही आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मराठी रंगभूमीवर काम करणारी मंडळी, ही इंग्लिश मध्ये किंवा हिंदी बॉलीवूड मध्ये काम करणाऱ्यांपेक्षा Well Cultured आणि सुज्ञ आहेत. आपण मराठी भाषिक जगाच्या तुलनेत कमी प्रमाणात आहोत, आपणच आपल्या भाषेचा आदर करणार, आपणच आपली भाषा पुढे नेणार, मराठीच्या अलंकारिक सौंदर्याचा हा ह्रास थांबायला हवा.नाहीतर लवकरच सौंदर्य म्हणजे काय हे विचारणारे महाभागही भेटतील.
~ऋग्वेद हट्टेकर

Leave a comment